कळंब -: तालुक्यातील मोहा येथे पाण्याचा हौदात पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील कावळेवाडी येथील भारत बाजीराव कावळे यांचा मुलगा महेश भारत कावळे (वय २ वर्ष) दि. १२ जून रोजी सकाळी १० वाजता हा मोहा तालुका कळंब येथील त्यांच्या सध्या राहत असलेल्या घराच्या पाठीमागिल जनावरे पाणी पिण्याच्या हौदा जवळ खेळत असताना तो अचानक हौदात पडून त्याचा मृत्यू झाला, या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो.ना.जाधव हे करीत आहेत.