कळंब -: तालुक्यातील मस्सा (खं) येथील एका इसमाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ११ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे,
      मस्सा (खं) येथील चंद्रकांत उत्तरेश्वर थोरात (वय ४५ वर्ष) यांनी दि. ११ रोजी चार वाजण्याच्या सुमारास त्याच्या स्वताच्या शेतातील नदीच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाला दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो.ना. संजय म्हेत्रे हे करीत आहेत.  
 
Top