उमरगा (लक्ष्‍मण पवार) :- येथील समाज विकास संस्‍थेच्‍यावतीने दर वर्षीप्रमाणे यंदाचे राज्‍यस्‍तरीय कार्यकर्ता गौरव पुरस्‍कार जाहीर झाले असून दि. 15 जून रोजी वात्‍सल्‍य बालगृहाच्‍या आठव्‍या वर्धापन दिना निमित्‍ताने मान्‍यवरांना सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.
    महेश भगत आनंदवन (गडचिरोली), लक्ष्‍मण खेडकर (पाणी पंचायत पुणे), डॉ. दीपक चव्‍हाण (श्री सेवा हॉस्‍पीटल, उमरगा), श्रीमती विजया तुळशीवार (सचिव - दिलासा, यवतमाळ), श्रीमती राजू पाटील (समाज विकास संस्‍था, उमरगा), भगवान बनसोडे (अधिक्षक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मा.शा.वि. वसतीगृह नळदुर्ग), सिध्‍दार्थ माने (अधिक्षक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मा.शा.वि. वसतीगृह तुळजापूर), सी.ए. वरात, गणेश जाधव, श्रीमती एस. सुकळकर यांना शाल, श्रीफळ, सन्‍मानपत्र, मानचिन्‍ह व रोख एक हजार एक्‍कावन रुपये देवून सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.
 
Top