उस्मानाबाद -: सन 1988 च्या अभ्यासक्रमाने शिक्षणामध्ये महाराष्ट्रात एकसूत्रता निर्माण केली तो उद्देश समोर ठेवून प्रत्येक शिक्षकांनी अभ्यासक्रमाच्या विकासाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन  उदष्टिनिहाय अध्यापनाचे कार्य करावे, असे मत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एन. के. जरग यांनी मांडले.
    जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्ह्यात इयत्ता तिसरीच्या अध्यापन करणा-या शिक्षकांसाठी जिल्हा परिषद शाळेत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रशिक्षणास भेट दिली त्यावेळी त्यांनी आपले मत मांडले. याप्रसंगी डायटच्या प्राचार्या डॉ.कमलादेवी आवटे, शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे,जेष्ठ अधिव्याख्यता डॉ. दयानंद जटनुरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.जाधव, गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांची  उपस्थिती होती.
    जरग मार्गदर्शन करतांना म्हणाले की, राज्यातील प्राथमिक शिक्षणाचा पुनर्रचित अभ्यासक्रम 2014-15 पासून इयत्ता तिसरी व चौथीसाठी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे काम सुरु असून त्याचाच हा एक भाग आहे. प्रशिक्षणाची गरज प्रशिक्षणार्थींना विविध उदाहरणातून सांगितली.तसेच पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार ज्ञानरचनावाद हे एनसीएफ-2005 नुसार वर्गातील आंतरक्रिया कशा असाव्यात, अध्यापनातील विविध बाबी अंमलात आणून अध्यापनाच्या क्रिया त्यानुसार घडवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  
       या प्रशिक्षणास मराठी व उर्दू माध्यमातील शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.
 
Top