कळंब -: महाराष्‍ट्र राज्‍यातील इयत्‍ता तिसरी व चौथी वर्गाचा पुनर्रचित अभ्‍यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्‍यात आला आहे. नवीन अभ्‍यासक्रमाविषयी कळंब तालुक्‍यातील इयत्‍ता तिसरी वर्गाला अध्‍ययन अध्‍यापन करणारे 162 शिक्षकांना तालुकास्‍तरीय सावित्रीबाई फुले विद्यालय येथे दि. 9 जून ते 13 जून असे पाच दिवसीय प्रशिक्षण देण्‍यात आले.   
      पुनर्रचित अभ्‍यासक्रमानुसार इयत्‍ता प‍हिली व दुसरीचा अभ्‍यासक्रम लागू करण्‍यात आला आहे. 2014-15 या शैक्षणिक वर्षापासून तिसरी व चौथीचा अभ्‍यासक्रम लागू करण्‍यात आला आहे. कळंब तालुक्‍यातील 162 शिक्षकांना इयत्‍ता तिसरी पुनर्रचित अभ्‍यासक्रमाचे प्रशिक्षण देवून प्रशिक्षित केले जात आहे.
         कळंबचे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गावडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली 9 साधन व्‍यक्‍तीमार्फत प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण यशस्‍वी करण्‍यासाठी शिक्षण विस्‍ताराधिकारी संजीव बागल, मधुकर तोडकर, श्रीमती सविता कुंभार, जयमाला शिंदे, पांडुरंग गामोड आदीजणांनी परीश्रम घेतले.
    
 
Top