सोलापूर -: महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणानुसार व्यायामशाळा विकास अनुदान योजनेत सुधारणा करण्यात येऊन त्यानुसार क्रीडांगण विकास योजने अंतर्गत व्यायामशाळा व क्रीडांगण विकासासाठी जिल्हास्तरीय विकास अनुदान मर्यादा रु. दोन लाखावरुन रु. सात लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच व्यायामशाळा योजनेच्या निकषात सुध्दा अंशत: बदल करण्यात आलेले आहेत.
      व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदानाचे नवीन अर्ज कार्यालयात उपलब्ध असून संबंधित संस्थेद्वारे हे अर्ज दिनांक 21 जून 2014 पर्यंत प्राप्त करुन घेऊन आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 19 जुलै 2014 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. उशीरा प्राप्त प्रस्तावांचा कोणत्याही प्रकारे विचार करण्यात येणार नाही. संबंधित शासन निर्णय www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्यांचा सांकेतांक क्र. (क्रीडांगण विकास अनुदान) 201402141209295521 तसेच (व्यायामशाळा विकास अनुदान) 201401221752454121.
    अधिक माहितीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
 
Top