उस्मानाबाद :- शहर सौंदर्यीकरणासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी घेतलेल्या पुढाकारातून बुधवारी उस्मानाबाद शहरातील भोगावती नदीपात्रातील स्वच्छता मोहिमेस नगरपालिकेने सुरुवात केली. जिजामाता उद्यानाजवळील नदीच्या पात्रातील कचरा काढण्यास आज सुरुवात करण्यात आली. शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेच्या या मोहिमेस त्या-त्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि ही मोहीम लोकचळवळ बनावी, असे आवाहन त्यांनी केले.
बुधवारी दुपारी भोगावती नदी पात्रातील कचरा जेसीबीच्या साह्याने काढण्यास सुरुवात झाली. नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर यांच्यासह नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
डॉ. नारनवरे यांनी या ठिकाणची पाहणी केली. नदीपात्र स्वच्छ झाले तर खऱ्या अर्थाने शहर स्वच्छ करण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल पुढे पडणार आहे. नागरिकांनी नगरपालिकेच्या घंटागाडीतच कचरा टाकावा, इतरत्र कचरा टाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. नदीपात्र स्वच्छ ठेवणे ही स्थानिक नागरिकांचीही जबाबदारी आहे. कचरा इतरत्र व रस्त्यावर टाकणाऱ्या नागरिकांना दंड करण्याचे निर्देशही त्यांनी नगरपालिकेला दिले.
शहर स्वच्छतेच्या या मोहिमेसाठी सर्वांनीच आपला वाटा उचलला पाहिजे. बॅंका इतर सामाजिक संस्था, व्यापारी संघटना यासाठी पुढे येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवावा, अधिकाधिक हिरवागार करावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. शहर विद्रुप करणाऱ्यांविरुद्ध आणि अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश त्यांनी दिले. सार्वजनिक जागेत करण्यात आलेली अतिक्रमणे नागरिकांनी स्वताहून काढून टाकावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. वाहतुकीला अडथळा ठरतील अशा ठिकाणी वाहन पार्किंग करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
विविध सामाजिक संस्था, संघटना यांनी आपापल्या भागातील परिसर स्वच्छतेसाठी मोहीम राबवावी, तसेच नदीपात्रालगत राहणा-या लोकांनीही नदी अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
नदीपात्र, शहरातील उद्याने, सार्वजनिक ठिकाणच्या जागा स्वच्छ राहतील, हे पाहा, असे त्यांनी सांगितले. चारठाणकर यांनी, कॅरीबॅगमुक्तीसाठी व्यापारी संघटना आणि नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आता शहर स्वच्छतेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. नागरिकांनी घंटागाडीतच कचरा टाकावा. नगरपालिकेची घंटागाडी वॉर्डामध्ये आली नाही तर तात्काळ तक्रार नोंदवावी, मात्र कचरा इतरत्र टाकू नये, असे आवाहन केले.