सोलापूर -: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने मंगळवार दिनांक 10 जून 2014 रोजी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली.
शहरातील दत्त चौक परिसरात शुभराय टॉवर्स या इमारतीच्या दुस-या मजल्यावरील केळकर हॉस्पिटल मध्ये आग लागल्याचा बनावट देखावा तयार करुन म.न.पा. अग्निशमन विभाग, पोलीस, एम.एस.ई.बी., जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांना आग लागल्याने सदर इमारतीत 27 रुग्ण व 7 कर्मचारी अडकले असून 2 रुग्णांनी इमारतीवरुन उडी मारल्याने ते जखमी झालेले आहेत. असा निरोप जिल्हा नियंत्रण कक्षातुन तसेच घटनास्थळावरुन फोनद्वारे देण्यात आला. निरोप दिल्याचे 5 मिनिटाने अग्निशामन दलाचा बंब, कर्मचारी यांचे सोबत अग्निशामन अधिकारी श्री. आवटे हजर झाले. 7 मिनिटांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ट पोलीस निरिक्षक श्री.पाटील, पोलीस निरिक्षक श्री.साळूंखे, सहायक पोलीस निरिक्षक श्री.डोके, व डिटेक्श ब्रँचचे सहायक पोलीस निरिक्षक श्री.खटाणे आपल्या कर्मचा-यांसह घटनास्थळी हजर झाले. जिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका 25 मिनिटांनी तसेच एमएसईबी चे कर्मचारी 8 मिनिटात घटनास्थळी हजर झाले. पावसाळ्यापूर्वी शासकीय विभागांची तत्परता तपासण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आदेशाने व विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विनीत तेलोरे यांनी आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम घेतली.