उस्मानाबाद :- शासनाकडून पाणीटंचाई निवारणासाठी प्राप्त झालेली रक्कम संबंधित यंत्रणेच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. ती रक्कम तात्काळ संबंधित मालक व शेतक-यांना उपलब्ध करुन द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात टंचाई परिस्थितीबाबत विशेष कार्यगटाची आढावा बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उस्मानाबाद, कळंब, भूम, उमरगा येथील उपविभागीय अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. तांगडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. भालेराव, सरकारी अभियोक्ता व्ही.बी.शिंदे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी या परिस्थितीत जिल्ह्यात 60 गावे व 9 वाडयात मिळून 63 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे तर 96 गावात 144 विहिर/बोअरचे अधिग्रहण करुन पाणीटंचाईवर मात करण्यात येत असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात किती विंधन विहिरींचे कामे सुरु आहेत व किती बंद आहेत याचा अभियंतानिहाय आढावा सादर करावा. पुढील काळात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन जून, जुलै आणि ऑगस्ट, 2014 साठीचे नियोजन करणे, पावसाळयात पाणी वाहून जाऊ नये यासाठी पाणी पुनर्भरण कामांचा आराखडा तयार करणे, सिंमेट नाला बंधारेच्या कामांचे टेंडरची प्रक्रिया पूर्ण करुन कामे सुरु करणे, रस्त्यांची कामे पावसाळया अगोदर करुन घेणे अदि विषयांचा जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.