उस्मानाबाद -: जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतने उस्मानाबाद येथे सर्वसाधारण घटकातील युवती व महिलांसाठी आणि तेर (ता. उस्मानाबाद) येथे विशेष घटक योजनेतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांसाठी मोफत अन्नधान्य व फळ प्रक्रियेवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उस्मानाबाद येथे 14 जून ते 14 जुलै,2014 तर तेर येथे 17 जून ते 15 जुलै,2014 या कालावधीत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणात विविध शासकीय योजना, बँकेसंबंधी माहिती देण्यात येणार असून यशस्वी उद्योजक व तज्ञ मार्गदर्शक व अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
तरी उस्मानाबाद येथील प्रवेशासाठी इच्छुकांनी 13 जूनपर्यंत संपर्क साधावा. त्याच दिवशी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. तेर येथे 14 जून,2014 पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून प्रशिक्षणार्थींची दि. 16 जून रोजी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे, असे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
उस्मानाबाद येथील प्रशिक्षणासाठी कार्यक्रम समन्वयक राजकुमार गायकवाड (मो. क्र.9011219701) तर तेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात शाम झिंजे (मो. क्र.8975296371) यांच्याशी संपर्क साधावा.