उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील निर्मल भारत अभियान व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या गावामध्ये गुडमॉनिंग पथकामार्फत उघडयावर शौचास बसणा-या अंबेहोळ येथील आवाड बापू जीवन, लोंढे नारायण बोधा, लोंढे शामराव बाळू, दत्तात्रय उध्दव डिसले, सुरेश लक्ष्मण गायकवाड, कादर हमीद पठाण, दशरथ दगडू झेडे, वैजीनाथ काशीनाथ गायकवाड या आठ व्यक्तींना उघडयावर शौचास विधी करत असताना पकडण्यात आले व ग्रामीण पोलीस ठाणे, उस्मानाबाद यांच्या ताब्यात देण्यात आले.
पथक प्रमुख तथा गटविकास अधिकारी एन.के.गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी एन.एस.राठोड, बालविकास प्रकल्प अधिकारी एस.डी. मेदणे, एम.एच.पवार, श्रीमती जे.यू.तपिसे, ग्रामसेवक व्ही.डी.ढोकणे यांनी पोलीस पथकासह सकाळी 5-45 वाजता ही कार्यवाही केली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.