मुंबई -: पोलीस भरतीसाठी सुरु असलेल्या मैदानी चाचण्यांमध्ये दोन तरुणांचा धावतानाच मृत्य झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिस भरतीसाठी मालेगावहून अंबादास सोनावणे या २३ वर्षीय तरुण पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत दाखल झाला. बुधवार रोजी दुपारी तीन वाजता विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे पोलीस भरतीसाठी धावण्याची स्पर्धा होती. मात्र अंबादास सोनवणे या तरुणाचा तळपत्या उन्हात धावताना मृत्यू झाला. तर गेल्या रविवारी ऐरोलीतील पटनी ग्राऊंड येथे धावताना कोसळलेल्या विरारच्या प्रसाद प्रकाश माळी (१९) याचे उपचारादरम्यान वाशीतील महापालिकेच्या हॉस्पिटलात निधन झाले.