नळदुर्ग :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फेसबुकद्वारे अवमान करणा-या समाजकंटकाच्या निषेधार्थ नळदुर्ग येथे रिपाइंसह विविध पक्ष व संघटनांच्यावतीने मोर्चा काढून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.
नळदुर्ग येथील बुध्दविहार पासून किल्ला गेट, चावडी चौक, शास्त्री चौक, मुख्य बाजारपेठ मार्गे रिपाइं, शिवसेना, भाजप, मनसे, क्रांतीज्योत अॅटोरिक्षा चालक मालक संघटना आदींच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा एसटी बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणा-या समाजकंटकाचा जाहीर निषेध करुन कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.वाय. डांगे, मंडळाधिकारी माणिक पवार यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर चव्हाण, तालुकाउपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोष पुदाले, मनसे शहराध्यक्ष ज्योतीबा येडगे, रिपाइं आघाडी युवाचे तालुकाध्यक्ष अरूण लोखंडे, तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम, बापू दुरुगकर, दयानंद काळुंके, आर.एस. गायकवाड, अशोक अलकुंटे, संतोष झेंडारे, प्रा. आर.आर. सोनकांबळे, अंकुश लोखंडे, दत्तात्रय बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. हा मोर्चा रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, नळदुर्ग शहराध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
त्याचबरोबर अणदूर, जळकोट येथेही रिपाइंच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. अणदूर बंद करुन समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. नागनाथ कांबळे, नागेश सुयर्वंशी, लक्ष्मण दुपारगुडे, मल्लीनाथ जाधव, भुजंग कांबळे, राम नागविले तर जळकोट येथे सुनिल माने, अरुण माने, आकाश लोखंडे आदी सहभागी झाले होते.