कळंब -: रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी व उस्मानाबाद जिल्हा आट्या-पाट्या मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20 ते 22 जून रोजी सतरा वर्षाखालील मुला-मुलींच्या (ज्युनीअर गट) राज्यस्तरीय आट्या पाट्या अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचे कळंब शहरात प्रथमच आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धा विद्याभवन हायस्कुलच्या प्रांगणात होणार असून या स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलांचे 35 व मुलींचे 35 असे एकण्ूा 70 संघ सहभागी होणे अपेक्षित आहे. स्पर्धेत एकूण जवळपास 750 खेळाडू, राज्यस्तरीय पंच व मार्गदर्शक सहभागी होत आहेत. कळंबमध्ये प्रथमच ऐवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून एवढ्या मोठ्या संख्येनी खेळाडू येत आहेत. त्यांच्या स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
ज्या मैदानावर या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत त्या मैदानाला कै. ज्ञानदेव मोहेकर क्रिडानगरी असे नावे देण्यात आले असून तीन मैदान बनविण्यात आले आहे. स्पर्धेतील सर्व संघ दि. 20 जून रोजी कळंब शहरातून काढण्यात येणा-या रॅलीमध्ये सहभागी होतील.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी रोटरीचे अध्यक्ष अॅड. दत्ता पवार, सचिव धमेंद्र शहा, प्रोजेक्ट चेअरमन प्रा. संजय घुले, सुशील तिर्थकर, संजय देवडा, लक्ष्मण मोहिते, आट्यापाट्या मंडळाचे सचिव शरद गव्हार, परमेश्वर मोरे, अनिल शिंदे, राजाभाऊ शिंदे, तुकाराम भोसले, महादेव गव्हार, क्रिडा मंडळ येथील सर्व सदस्य व खेळाडू प्रयत्न करीत आहेत.
स्पर्धेचा लाभ परिसरातील सर्व विद्यार्थी व क्रिडाप्रेमींनी घ्यावा,
असे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.