पांगरी (गणेश गोडसे) :- तु बोअर का घेतलेस असे म्हणत बाराजणांनी वाहनातुन येऊन एका शेतक-याला मारहान करत शेतातील झाडास बांधुन त्याच्या मालकीच्या बोअरमधुन पंप केबल पाइप काढुन नेऊन जाताना बोअरमध्ये दगड गोटे टाकुन बोअर निकामी करूण शेतक-याचे नुकसान करत त्याच्या खिशातील रोख पाच हजार रूपये काढुन नेल्याची घटना उक्कडगांव (ता. बार्शी) शिवारात रात्री घडली.
    नवनाथ राजाराम मुंढे (वय 60, रा. उक्कडगांव, ता.बार्शी) असे धक्काबुक्की झालेल्या शेतक-यांचे नांव असुन असुन बबन ज्ञानोबा चौधरी, शहानुर उमराव, मुलाणी जहॉंगिर, उमराव मुलाणी, महिवाल जहॉंगिर, मुलाणी उसमत, मुलाणी राजकुमार, अनोबा चौधरी, बाबशा मदन, चौधरी शिवाजी, नारायण चौधरी, बबन नारायण चौधरी, जगन्नाथ श्रीधर चौधरी, रघुनाथ श्रीधर चौधरी, रणजीत पांडुरंग चौधरी (सर्व रा. पिंपळवाडी, ता. बार्शी) अशी शेतक-यास धक्काबुक्की करून बांधुन ठेऊन बोअरचे साहित्य घेऊन गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत. आरोपीमध्ये एका शिक्षकाचा समावेश आहे.
    नुकसानग्रस्त नवनाथ मुंढे या शेतक-यांने पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्यांनी त्यांच्या उक्कडगांव हदीतील गट नंबर 89 मधील त्यांच्या मालकीच्या शेतात बोअर घेऊन त्यात पंप, केबल, पाईप आदी लाख रूपयांच्या पुढील साहित्य घातले होते. मुंढे शेतातच थांबले असताना रात्री 11 वाजण्‍याच्या सुमारास वरील आरोपींनी एका जीपमधुन त्यांच्या शेतात येऊन तु येथे बोअर का घेतले असे म्हणत त्यांना धक्काबुक्की करत त्यांना जवळच्याच लिंबाच्या झाडास बांधुन बोअरमधील सर्व साहित्य काढुन घेऊन गेले व जाताना बोअरमध्ये दगड आदी साहित्य टाकुन ते निकामी केले व पोलिसात गेल्यास तुझे संपुर्ण कुटुंबच संपवण्‍याची धमकी दिली. मुंढे यांनी बोअर घेण्‍यासाठी 45 हजार रूपये खर्च केले होते. तसेच मोटार, केबल, स्टाटर आदी खरेदी करण्‍यासाठी 85 हजार रूपये खर्ची घातले होते. जखमीचा मुलगा गोरख मुंढे व बापु वाघमारे यांनी शेतात येऊन त्यांची मुक्तता केली, असेही फिर्यादित म्हटले आहे. मुंढे यांच्या फिर्यादिवरून पिंपळवाडीच्या बारा जणांविरूदध जबरदस्तीने मोटार, स्टाटर केबल आदी साहित्य व रोख पाच हजार रूपये नेऊन त्यांना बांधुन ठेऊन धक्काबुक्की करत धमकी दिल्याप्रकरणी पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. आरोपी फरार झाले असुन अधिक तपास हवालदार जनार्धन सिरसट हे करत आहेत.
 
Top