उस्मानाबाद :- कळंब तालुक्यातील डिकसळ येथे पालक तांत्रिक व सहायक कार्यक्रम अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेट दिली.
       डिकसळ येथे पालक तांत्रिक व सहायक कार्यक्रम अधिकारी यांच्यासाठी कामाचे मोजमाप, मेजरमेंट बुक भरणा आदि विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या प्रशिक्षणास प्रत्यक्ष शेतात जाऊन भेट दिली. त्यावेळी शेतामध्ये रस्ता व एक विहिरींचे काम सुरु होती, याचीही त्यांनी पाहणी केली. व संबंधित कामाचे नोंदणी, मोजमाप कसे करायचे याबाबत संबंधिताकडून माहिती घेतली. आणि त्यांना सूचना दिल्या.
       यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीरंग तांबे, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार वैशाली पाटील आदिंसह संबंधित अभियंते आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
Top