परंडा :- सोनारी (ता. परंडा) येथील भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष प्रा. तानाजी सावंत हे शिवसेनेत शुक्रवार दि. 20 जून रोजी प्रवेश घेणार आहेत. उद्या मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे यांच्‍या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.
    लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या यादीत असलेले प्रा. तानाजी सावंत यांनी उमेदवारी न मिळाल्याने विचारमंथन करून आपली भूमिका मांडली होती. तर त्यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती यांनी अपक्ष उभे राहून बंडाचे निशान रोवले होते. परंतु, त्यानंतर सपशेल माघार घेऊन लोकसभेच्या रिंगणातून काढता पाय घेतला होता. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत प्रवेशासाठी मोठी चढाओढ लागली आहे. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी नुकताच पक्ष प्रवेश केला. त्‍यांच्‍या पाठोपाठ आता प्रा. तानाजी सावंत हे शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत.
अणदुर - तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा अणदुर ग्राम पंचायत सदस्य अरविंद आपणा आलुरे वय ५५ वर्षे यांचे बुधवार (ता १८ )रोजी चिवरी शिवारातील त्यांच्या शेतात हृदयविकाराच्या झटक्याने दुपारी दिड च्या सुमारास निधन झाले.
अरविंद आलुरे हे विस वर्षा पुर्वी पंचायत समिती सदस्य होते.अणदुर ग्राम पंचायत मध्ये तिन वेळा सदस्य म्हणून निवडून आले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर ता १९ रोजी सकाळी आठ वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या अकस्मात निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. - See more at: http://osmanabadlive.com/Latestnews-1856-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%20%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A8-.html#sthash.tPnF7Tct.dpuf
 
Top