बार्शी - बार्शी येथील सोलापूर रोड परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. घरातील सख्ख्या भावासह एका तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत वाशी ता.धाराशिव (उस्मानाबाद) व बार्शीतील पिडीत मुलीच्या भावाविरोधात मुलीच्या आईनेच बार्शी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
यातील आरोपींनी मागील सुमारे सात महिन्यांपासून मुलीचे लैंगीक शोषण केले असून मुलगी सध्या पंधरा वर्षांच्या आसपास आहे. आरोपींनी पिडीत मुलीला वेळोवेळी धमकी देऊन बळजबरी संभोग केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. बार्शी पोलिसांनी फिर्यादीवरुन ३७६, २ (फ), लैंगीक शोषण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेखा धस या करीत आहेत.