वैराग (महेश पन्हाळे) : विधानसभेची निवडणूक असो वा लोकसभेची निवडणूक असो, आतापर्यंत वैराग भागात सभा गाजल्या त्या वैराग तालुका निर्मितीवरुनच. अनेक पक्षाच्या नेत्यांनी तालुका निर्मितीची अनेकवेळा आश्वासने दिली. मात्र राजकारणामध्ये जितका विषय चघळला गेला तितक्या प्रमाणात कृतीतून पुढे गेला नाही ही वैराग भागाची कायम शोकांतिकाच राहिली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून निर्माण होत असलेल्या पालघर जिल्ह्याप्रमाणे बाश्री तालुक्याचे विभाजन करुन वैराग तालुका निर्माण व्हावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. सध्या विभाजनाचे वारे वाहू लागल्याने वैराग तालुका अस्तित्वात येईल, अशा आशा वैराग भागातील जनतेमध्ये निर्माण झाल्या आहेत. अनेक वर्षापासून तालुका निर्मितीची मागणी प्रलंबित आहे. त्यामुळे वैराग भागातील जनता तालुक्याच्या प्रश्नी नेहमी हळवी होते. याचाच फायदा राजकारणी मंडळी आपापल्यापरिने घेताना दिसत आहेत. कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी वैरागच्या जनतेला तालुका करण्याचे अभिवचन देत आला आहे. वैराग भागातील जनतेसाठी तीन प्रश्न नेहमीच गंभीरपणे उभे ठाकलेले आढळून आले आहेत. यामध्ये वैरागची ओळख असलेला संतनाथ सहकारी साखर कारखाना हा तालुक्यापाठोपाठचा मोठा प्रश्न आहे. बंद पडलेल्या या साखर कारखान्यामुळे वैराग भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पाठोपाठ वैरागचा पाणीप्रश्नही गंभीर बनत आहे. जवळगाव मध्यम प्रकल्प, ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्प, हिंगणी मध्यम प्रकल्प असे तीन प्रकल्प असताना देखील वैराग भाग सुजलाम्, सुफलाम् होऊ शकलेला नाही. त्यासाठी उजनीचे पाणी या भागातून फिरणे गरजेचे आहे. प्रश्न गंभीर असले तरी पाठपुरावा आणि सातत्य या गोष्टीही असणे गरजेचे आहे. वैराग तालुका निर्मितीचा प्रस्ताव शासकीय स्तरावर पुढे सरकत आहे. पण प्रत्यक्ष कृती होताना आढळत नाही. ज्या नेत्यांनी आश्वासने दिली त्यांनी पाठपुरावाही केला नाही आणि सातत्यही ठेवलेले नाही. वैराग तालुका निर्मितीसाठी ज्येष्ठांनी घेतलेले कष्ट, आजच्या नेत्यांचा आदर्श बनला पाहिजे, मात्र तसे होताना दिसत नाही. छोट्या-मोठय़ा गावात दोन-तीन, दोन-तीन गट-तट निर्माण झाल्याने एकमेकांवर कुरघोडी करुनच राजकारण सुरु आहे. पण तालुक्याच्या प्रश्नी सगळ्यांनी आपले मतभेद विसरुन एकत्र येणे महत्वाचे आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत नोंदवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मतांच्या जोरावरच राजकारणाची दिशा ठरत असते. मात्र एखाद्या विकासाच्या कामामध्ये मतभेद असले तरी एकत्र येणे काळाची गरज असते. वैराग तालुका निर्मिती करत असताना तालुका निर्मितीबाबत कुणीही राजकारण करु नये अगर होवू नये यासाठी काळजी घेणे महत्वाचे आहे. इतिहासाचा दाखला घेऊन वर्तमानाच्या संगतीमध्ये भविष्याचा वेध घेतल्यास तालुका निर्मिती लांब नाही. मात्र त्यासाठी गट-तट, पक्ष, संघटना सर्व काही विसरुन सर्वांनीच कोणतेही राजकारण न करता एकत्र येऊन जनलढा उभारणे गरजेचे आहे.