नळदुर्ग :- निलेगाव (ता. तुळजापूर) शिवारात एका 18 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. 21 जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत इटकळ औटपोस्ट येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
काशिनाथ घोगरे (वय 18, रा. आरळी, ता. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. यातील काशिनाथ घोगरे हा पांडुरंग शेकप्पा गाडेकर यांच्याकडे जनावरे राखण्यासाठी सालगडी म्हणून कामाला होता. दररोजच्याप्रमाणे अनिल घोगरे हा गुरे राखण्यासाठी शुक्रवार दि. 20 जून रोजी निलेगाव शिवारात गेला होता. तो सायंकाळी परत आला नाही. त्यामुळे दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी शोधाशोध सुरु केली तेंव्हा वाघोळे यांच्या शेतातील झाडास अनिल घोगरे याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी प्रत्यक्षदर्शी पाहणारे प्रशांत नवरदिवले यांनी पोलीस पाटील यांच्यामार्फत इटकळ औट पोस्ट येथे या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस कर्मचा-यांनी घटनेचा पंचनामा केला व मयताचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. मयताच्या मानावर जखमा दिसत होत्या. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेची नोंद इटकळ औटपोस्ट येथे झाली असून अधिक तपास पोहेकॉं. गोविंद पवार हे करीत आहेत.