बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : माढा न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञांना कुर्डूवाडी पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांकडून उध्दट वागणूक देण्‍यात येत आहे. यचबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारीही त्यांना पाठीशी घालत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी लिगल सेलच्या वतीने करण्यात आली आहे.
     माढा वकिल संघातील अॅड्. अशोक पाटील हे दि.९ जून रोजी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते, यावेळी पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी पाटील यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली, तसेच उध्दट वर्तन करुन अरेरावीची भाषा वापरली. याबाबत पोलिस उपअधिक्षक अनिल पाटील यांना जाब विचारला असता केवळ नॉन कॉग्नीझेबल तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस उपअधिक्षक यांना सतत होत असलेल्या वागणूकीबाबत सांगीतले असता चुकीची उत्तरे देत पोलिस कर्मचारी वागत असलेले बरोबर असल्याचे सांगून त्यांची पाठराखन केली तसेच तक्रार देण्यासाठी करमाळा येथे या असे म्हणून हाकलून लावले व बेजबाबदारपणाचे उत्तर ऍड्. पाटील यांना देऊन अवमान केला.
      सर्वसामान्यांना न्या मिळवून देणार्‍या विधीज्ञांना पोलिस कर्मचारी व अधिकारी अशा प्रकारची वागणून देत असतील व तक्रार घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असतील तर सर्वसामान्यांचे काय होणार?, जे अधिकारी व कर्मचारी चांगले काम करत असतील त्यांच्याबद्दल निष्कारण गैरसमज होतील, त्याकरिता वेळीच अशा अधिकार्‍यांविरुध्द कारवाई करणे गरजेचे असून कोणत्याही विधीज्ञांचा अवमान राष्ट्रवादी लिगल सेल सहन करणार नाही वेळ प्रसंगी आंदोलनाचा मार्ग स्विकारु असे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी लिगल कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड.विकास जाधव यांनी म्हटले आहे. विधीज्ञांच्या वतीने बार्शी तहसिल कार्यालयामार्फत गृहमंत्री आर.आर.पाटील यांना निवेदन दिले असून याबाबत कोणती कारवाई होणार याकडे विधीज्ञांचे लक्ष लागले आहे.
 
Top