उस्मानाबाद :- सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातंर्गत  जिल्ह्यातील  खालील मागासवर्गीय मुला/ मुलींचे  शासकीय वसतिगृहाची 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठी  प्रवेश प्रक्रिया 23 जुनपासून  ऑनलाईन सुरु झाली असून मागासवर्गीय मुला/ मुलींनी  प्रवेशासाठी संबंधित वसतिगृहाच्या गृहपाल यांच्याशी संपर्क साधुन विहीत कालावधीत  प्रवेश अर्ज ऑन लाईन भरावेत. वसतिगृह प्रवेशासाठी प्रवेश अर्ज https://mahaeschol.maharashtra.gov.in  या वेबसाइ्टवर जाऊन रजिस्ट्रेशन करुन ऑनलाईन अर्ज मुदतीतच सादर करावेत, असे आवाहन अनिल शेंदारकर,  सहायक आयुक्त, समाज कल्याण, उस्मानाबाद यांनी केले आहे.
          जिल्हास्तर व तालुकास्तरावरील शासकीय वसतिगृहासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 जुलै असून  वसतिगृह निहाय प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी वेबसाइटवर 19 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येईल.  ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला असेल, त्या वसतिगृहाच्या गृहपाल यांच्याशी 24 जुलैपुर्वी संपर्क साधुन त्यांना मुळ कागदपत्रे दाखवून त्यांच्याकडे  कागदपत्राच्या झॅरोक्त प्रत सादर करावीत.
         उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह, एल. आय. सी. आफीस तुळजापूर रोड, उस्मानाबाद आणि मागासवर्गीय (मुलींचे) शासकीय वसतिगृह- आर. पी. कॉलेजच्या पाठीमागे, उस्मानाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह, तुळजापूर, शिंदे हायस्कुलच्या शेजारी, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय (मुलींचे) शासकीय वसतिगृह, तुळजपूर, एस. टी. कॉलनी-सैनिकी शाळेच्या समेार, तुळजापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह, नळदुर्ग- कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या पाठीमागे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह, लोहारा, सलगरा (दि). रोड, लोहारा, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय (मुलींचे) शासकीय वसतिगृह, बालाजीनगर-उमरगा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह, कळंब, पंचायत समितीच्याशेजारी, मागासवीर्गय व आर्थिकदृष्या मागासवर्गीय (मुलींचे )  वसतीगृह, वाशी, जुने एस. टी. स्टॅन्डजवळ-वाशी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह करमाळा रोड, आय. टी. आय. शेजारी, परंडा.
        ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सोबत जातीचा प्रवर्ग व जात जातीचा दाखल/ जात वैद्यता प्रमाण, पालकांचे वार्षिक उत्पन्न (सक्षम अधिकाऱ्यांचा) उत्पन्ननाचा दाखला, अनाथ अल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, अपंग असल्यास अपंगाची टक्केवारी व त्याबाबतचे (सक्षम अधिकारी) यांचे प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखाली असल्यास बी. पी. एल कार्डनंबर, मागील परीक्षेची गुणपत्रिका, विद्यार्थ्यांचा  /  पालकांचा मोबाईल क्रमांक/ ईमेल आयडी/ दुरध्वनी क्रमांक सोबत ठेवून ऑनलाईन अर्ज पुर्णपणे करावेत. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी. अर्जासोबत कोणतेही कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता नाही अथवा ती वसतिगृहाचे गृहपाल/ गृहप्रमुख यांच्याकडे सादर करण्याची आवश्यकता नाही.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश न घेतल्यास प्रवेश अर्ज रदृ करण्यात येईल. प्रतिक्षा यादी 30 जुलै रोजी वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल. प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना ज्या शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला असेल त्या वसतिगृहाच्या  गृहपाल यांच्याशी 5 ऑगस्ट पुर्वी संपर्क साधुन पवेश घ्यावे. एकदा मिळालेले शासकीय वसतिगृह कोणत्याही कारणास्तव बदलून मिळणार नाही. अर्जात चुकीची माहिती आढळून आल्यास किंवा कागदपत्रे उपलब्ध नसल्यास त्या विद्यार्थ्यांचा अर्ज रदृ केला जाईल.
         ऑनलाईन अर्ज भरण्यास कांही अडचणी आल्यास त्यांनी मागासवगीर्य वसतिगृहात कागदपत्रे/ माहिती घेवून आल्यास त्यांचे अर्ज संबंधित वसतिगृहाच्या गृहपालकांकडून भरुन घ्यावेत अथवा आपल्या जिल्ह्यातील  शासकीस वसतिगृहाचे गृहपाल, संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण/ सबंधित विभागाचे प्रादेशिक उप-आयुक्त समाज कल्याण यांच्याशी संपर्क सधावा व त्या अधिका-यांचे  दुरध्वनी क्रमांक वरील वेबसाईटवर संपर्कासाठी दिलेले आहे.  व्यावसायीक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम तारीख 31 जुलै नंतर वरील वेबसाईट वर प्रसिध्द करण्यात येईल.
 
Top