उस्मानाबाद -: सोशल नेटवर्कीग या फेसबुक व इतर साईटला तात्काळ प्रवत्त होणारा तरुण वर्ग तात्काळ प्रभावित होतो आणि त्याअनुषंगाने विविध जिल्ह्यात होणा-या घटनेला तरुण वर्ग बळी पडतो व त्यांचे भाविष्य संकटात पडू नये,यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी आपले मत मांडले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, अतिरिक्त् पोलीस अधिक्षक बाळकृष्ण भांगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य मसूद शेख, डॉ.दत्तात्रय गायकवाड, कादर खान, असदखॉ पठाण, नगरसेवक खलीपा कुरेशी आदिंची उपस्थिती होती.
हकीम यावेळी म्हणाले की, जिल्ह्यात भविष्यात अप्रिय घटना घडू नये यासाठी वेळीच उपाययोजना करुन संबंधितावर गुन्हे नोंद करुन तक्रारी कमी करण्यासाठी प्रयत्न करावा. धार्मीक स्थळे, महापुरुष व नेत्यांची फेसबुकवर विविध चित्रे अपलोड करुन समाजात ताण-तणाव निर्माण करण्याचे कार्य सुरु आहे. त्याला नागरिकांनी बळी पडू नये,यासाठीही पोलीस व जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात,अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी सर्व घटकातील व्यक्तींनी संयम राखला, तरुणांनी प्रतिसाद दिल्याबद्दल आणि पोलीस व प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील यांनी सोशल नेटवर्कीग फेसबुक सारख्या साईटवरील आक्षेपार्ह छायाचित्राला बळी पडू नये यासाठी करत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.
तत्पूर्वी हकीम यांनी उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी तर लोहारा तालुक्यातील माकणी गावास भेट देऊन त्याठिकाणी घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. दोषी व्यक्तींवर गुन्हे नोंद करुन कारवाई करण्याची सूचना देऊन त्याचा सविस्तर अहवाल आयोगास पाठवावा, असेही संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.