उस्मानाबाद तालुक्यातील घोगरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आयोजित विवेकानंद सेवाभावी संस्था, डोंबीवलीच्या सहकार्याने अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना बि-बियाणे, जैवीक खत वितरण कार्यक्रमात तोटावार यांनी केले. यावेळी तालुका कृषि विकास अधिकारी डी. आर.जाधव, प्रगतीशिल शेतकरी भाऊसाहेब सावंत, कृषी पर्यवेक्षक बी. ए. पाटील, विवेकानंद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष केतन बोंदर, मंडळ कृषि अधिकारी ए. पी. चिक्षे आदि उपस्थित होते.
यावेळी श्री.तोटावार म्हणाले की, या भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन होते. शेतक-यांनी उत्पादीत भाजीपाला विक्रीसाठी मोठ्या बाजारपेठेत पुरविण्याची व्यवस्था करण्यात येईल. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला होता. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने डोंबीवली येथे विवेकानंद सेवाभावी संस्थेने शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली. शेतक-यांना सुमारे 80 हजार रुपयाचे बी-बीयाणे, जैवीक खत मदत दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. घोगरेवाडी गाव मॉडेल गाव करुन या गावच्या शेतीचे विकास कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
विवेकानंद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष केतन बोंदर म्हणाले की, अवकाळी पाऊस, व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल होवून अडचणीत आला. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संस्थेने सुमारे 350 शेतक-यांना मदतीचा हात दिला असल्याचे सांगून गावच्या विकासात गावक-यांचा सहभाग महत्वाचा असून गावक-यांनी एकजुटीने काम करावा. आधुनिक तंत्र व मार्केटींगचा अभ्यास करुनच शेतीचे उत्पन्न घ्यावे, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.
प्रगतीशिल शेतकरी श्री सावंत, म्हणाले की, कृषी विभागाने या घोगरेवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मॉडेल गाव म्हणून निवड करुन येथे शासनाच्या कृषी विभागाने विविध योजना राबवण्याची आवश्यकता आहे अशी आग्रहाची मागणी केली.
प्रास्ताविकात तालुका कृषि अधिकारी श्री. जाधव यांनी केले.या कार्यक्रमास विवेकानंद स्वयंसेवी संस्थांचे उपाध्यक्ष रवी वारंग, कोषाध्यक्ष शैलेश निपुलगे,संस्थेचे सदस्य, प्रगतीशिल शेतकरी, लोकप्रतिनिधी,गावकरी आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृषि पर्यवेक्षक के. जी. सुरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ कृषि अधिकारी ए. पी. चिक्षे यांनी केले.
पॉली हाऊसला भेट
एमआयडीसी भाग परिसरातील शुरसेन शहाजी घोगरे यांच्या पॉली हाऊसला विवेकानंद संस्थेचे केतन बोंदर, संस्थेचे उपाध्यक्ष रवी वारंग, कोषाध्यक्ष शैलेश निपुलगे,संस्थेचे सदस्य, प्रगतीशिल शेतकरी, सावंत, संस्थेतील पथकानी भेट देवून शेततळी, फुलशेतीची पाहणी करुन विविध फुलांची सविस्तर माहिती घोरगे यांनी दिली. त्यांच्यासमवेत कृषी अधीक्षक, शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी डी.आर.जाधव, प्रगतीशिल शेतकरी भाऊसाहेब सावंत, कृषी पर्यवेक्षक बी. ए. पाटील, मंडळ कृषि अधिकारी ए. पी. चिक्षे आदि उपस्थित होते.