तुळजापूर :- राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील सलगरा मड्डी, बोरगाव (तु), शिंदगाव, हंगरगा (नळ) आदि गावाना भेटी देवून तेथील जनतेच्या अडी-अडचणी समजावून घेतल्या. शासकीय योजनेपासून कोणीही वंचित राहू नये,असे प्रतिपादन श्री. चव्हाण यांनी केले.
        तुळजापूर तालुक्यातील सलगरा मड्डी  येथे सामाजिक सभागृह, इंदिरा नगर ते नळदुर्ग रस्त्याचे भुमिपुजन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले.यावेळी कोरडवाहू शेती अभियानाचे उदघाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या अभियानात शेतीशाळा, अभ्यासदौरा, पीकपाहणी याचा समावेश असल्याने यात सर्व शेतक-यांनी  सहभाग नोंदवावा असेही त्यांनी सांगीतले
    यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, जि.प.कृषी सभापती पंडीत जोकार, जि.प.सदस्य दिलीपराव सोमवंशी, सिद्रामप्पा मुळे, तुळजापूर पं.स. चे उपसभापती प्रकाश चव्हाण, अशोक पाटील, हरिश जाधव, जनार्धन वाघमारे, कृषी अधिकारी  एस. बी.जाधव, सा.गटविकास अधिकारी आर.व्ही.चकोर, महावितरणचे अभियंता म्हेत्रे, नायब तहसिलदार गणपतराव वाघे यांच्यासह  पदाधिकारी उपस्थित होते.
        यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, या कोरडवाहू शेती अभियानाला येणा-या खर्चाची तरतूद केली असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या अभियानात सहभाग घ्यावा व अधुनिक शेती तंत्राची माहिती करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. नैसर्गिक आपत्तीमध्ये शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून गारपीटग्रस्त शेतक-यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगीतले. शासनाच्या विविध योजना जनतेच्या दारी पोहाचविण्यात आल्या असून त्याचा चांगला फायदाही जनतेला झालेला आहे. शासनाच्या कृषी संजीवनी योजनेंतर्गत शेतक-यांना थकीत वीज बीलापैकी 50 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित रक्कम माफ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.
       बोरगाव येथे के.टी. बांधाऱ्याचे,अंतर्गत रस्त्यांचे भुमीपूजन तर शिंदगाव ते कुनसाळवाडी डांबरी रस्त्याचे लोकार्पण, हंगरगा (नळ) येथे दलीत वस्ती सुधार योजनेतून मंजूर असलेल्या सभागृहाचे, व सिमेंट रस्त्याचे भुमीपूजन तसेच वसंत नगर येथे बंजारा समाज मेळाव्याचे उदघाटन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.     
 
Top