उस्मानाबाद -: अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील यांचे अध्यक्षतेखाली दि.1जुलै, 2014 रोजी बँक अधिका-याची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
    यावेळी श्री. पाटील आढावा घेताना म्हणाले की, बँकाना खरीप पीक कर्ज उदिष्ट दिले आहे ते या महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या विविध योजना जनतेसाठी राबविल्या जातात यामध्ये विविध उद्योग लागणारे कर्ज संबंधितांना उपलब्ध करुन देणे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाची आवश्यकता आहे त्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे. जनतेशी सर्व बँक अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना सहकार्य करावे,असे सांगितले.
    यावेळी लिड बँकेचे मॅनेजर दुपारगुडे, सहायक निबंधक श्री.शिंदे यांच्यासह बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
 
Top