उस्मानाबाद -: नेहरु युवा केंद्रामार्फत युवकांसाठी राबविण्यात येत असलेल्या कार्याचा आढावा आज दि.1 जुलै रोजी अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील यांनी त्यांच्या दालनात घेतला.
    यावेळी उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, नेहरु युवा केंद्राचे मोहन गोस्वामी, विकास कुलकर्णी, अॅड. विजय शिंदे, समाज कल्याण आयुक्त शेंदारकर,  टाटा सामाजिक संस्थेचे गणेश चादरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
    याप्रसंगी श्री. पाटील म्हणाले की, नेहरु युवा केंद्रामार्फत समन्वयांच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांचे जिल्हा व तालुकास्तरावर मेळावा घेण्यात येऊन शासनाच्या विविध योजनेबाबत जनजागृती करावी. गावामध्ये घरोघर स्वच्छालय, महिला सबलीकरण, वृक्षारोपण, गाव स्वच्छता मोहिम अशा समाज उपयोगी कार्याची जबाबदारी या युवकांना देऊन त्यांना सक्रीय करावे, अशा निर्देश संबंधितांना दिले. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
Top