उस्मानाबाद :- शिक्षण व क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचावावा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडु निर्माण  व्हावेत, यासाठी  राज्यात क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यात आली. या प्रबोधिनीमध्ये 8 ते 14 वयोगटातील मुलां-मुलीची बॅटरी ऑफ टेस्टव्दारे निवड करुन त्यांना खेळाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार आहेत. या निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त मुला-मुलींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय कुलकणी यांनी केले आहे.
    जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शाळेत जात नसलेल्या पंरतु उत्कृष्ट शारीरिक क्षमता असलेल्या 8 ते 14 वर्ष वयेागटातील मुलांमुलींसाठी खालीलप्रमाणे नैपूण्य चाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत. शाळास्तरावर 9 चाचण्या असून वजन, उंची, 30 मी धावणे, 800 मीटर धावणे, 6X 10 मीटर शटल रन, उभे राहून लांब उडी, उभे राहून उंच उडी, मेडिसीन बॉल थ्रेा व लवचिकता अशा एकुण 27 गुणांच्या चाचण्याचे आयोजन करुन यात किमान 17 गुण प्राप्त करणाऱ्या मुलांमुलींना पुढील तालुकास्तर चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येतील. शाळा पातळीवर निवड चाचण्याची अंतिम तारीख 7 जुलै आहे.
    जिल्हास्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्या दि. 25 ते 26 जुलै या कालावधीत श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबद येथे सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात येणार आहे.    सदर क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड झालेल्‍या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षणासोबत मराठी व इंग्रजी माध्यमाची शालेय शिक्षण, निवास, भोजनाची, वैद्यकिय सुविधा, संगणक प्रशिक्षण, शैक्षणिक सहल, विमा संरक्षण, गणवेश आदि दिले जाणार आहे.
    सदर निवड चाचण्यासाठी तालुका संयोजक पुढीलप्रमाणे राहतील. उस्मानाबादसाठी गणेश पवार, भ्रमणध्वनी क्रमांक-9970095315 व संदीप वांजळे-9850954237 क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद,  कळंबसाठी- एल. एम. मोहिते, शहिद भगतसिंग प्रशाळा, कळंब- 9423718902, परंडासाठी-सुधाकर कोकाटे, महात्मा गांधी विद्यालय-परंडा-9423758353,तुळजापूरसाठी-विष्णु दळवी, तालुका क्रीडा संकुल, तुळजापूर-9270917700,उमरगासाठी-राजू सोलनकर, सखुबाई माध्यमिक आश्रमशाळा बलसूर- 9665315110, भूमसाठी-वाघुंबरे व्ही. बी.न्यु हायस्कुल ईट- 9923518577, लोहारासाठी-पाटील एम. व्ही, वसंतदादा पाटील हायस्कुल लोहारा-9096507578 आणि वाशी तालुक्यासाठी विठल चौधरी, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्रशाला इंदापूर 9423828455 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
   अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथील मुख्य क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव -9028095500 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात  आले आहे
 
Top