पांगरी (गणेश गोडसे) :- बार्शी तालुक्यात कायदा सुव्यवस्थेने मान टाकल्यासारखीच परिस्थती निर्माण झाली असुन अवघ्या काही दिवसांच्या कार्यकाळात पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीत दोन युवकांचे वेगवेगळया कारणावरून धारदार शस्त्राने सपासप वार करून खुनासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. उल्लेखनिय बाब अशी की खुन करणारी मंडळी व खुन झालेले दुदैवी हे पंचेविशीच्या आसपासचेच आहेत. ज्यांनी अजुन हे आयुष्य व जग पाहणे गरजेच होते त्यांना आज तुरूंगाची हवा खावी लागत आहे. त्यामुळे समाज मनात अशांतताच धगधगत असुन नेमक काय घडतय काय चाललय याचा ताळमेळ समाजातील ज्येष्ठांना लागत नाही. कायदयाचा धाक संपला का, लोकांच्या मनातली काहीही केले तरी कांहीच फरक पडत नाही, अशी धारणा वाढीस लागलीय का हे कोण घडवुन आणु पहातय, अशा एक ना अनेक प्रश्‍न सध्या समाजासमोर वेगळया स्वरूपात उभे आहेत. स्फोटक परिस्थती लक्षात घेऊन बिघडलेली कायदा सुव्यवस्था पुर्वपदावर आणण्‍यासाठी पोलिसांना कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. सध्या पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
    अलिकडील कार्यकाळात पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीत दोन वेगवेगळया घटनांमध्ये दोन तरूणांचा दुदैर्वी मृत्यु झाला. खुनामागील कारणे काय? त्यातील मुळ रहस्य काय? खुन नेमका कशासाठी झाला असावा? पैसा अंतर्गत धुसफुस अथवा इतर कोणत्या कारणावरून खुनासारख्या गंभिर घटना प्रत्यक्षात झाल्या, याचा सोक्षमोक्ष पोलिस लावतीलही. मात्र बळी गेलेल्यांचा जिव कांही केल्या परत मिळणार आहे का? असा प्रश्‍न आहे. मरण इतक स्वस्त झालय का? किडयामुंग्यासारख आजकाल माणसांना मारल जावु लागलय. यावरून समाजातील भावी पिढीने काय बोध घ्यायचा. आजच्या युवा पिढीने भविष्यासाठी काय आदर्श घ्यायचा. विषेश बाब ही की खुनासारख्या कृर घटना हया मैत्रीतुनच पुढे आलेल्या आहेत. दोस्त दोस्त ना रहा हे चित्रपटातील गाणे आजच्या परिस्थतीला शोभेसे वाटत आहे. मैत्रीतुन कांही गोष्ठी विकोपाला जावुन त्यातुनच पाठिमागील सर्व गोष्‍टी विसरून मित्रच मित्राला संपवण्‍यासाठी पुढे सरसावत असल्यामुळे विश्‍वास कोणावर ठेवायचा? असा प्रश्‍न निर्माण होऊ लागला आहे. ज्याच्या मांडीवर जन्मदात्यानंतर विश्‍वासाने मान टेकवली जायची त्या मित्रांकडुनच केसाने गळा कापण्‍यासारख्या समाजघातक घटना घडु लागल्यामुळे समाजमने हेलावुन गेली असुन तरूणांची विचार करण्‍याची क्षमता संपलीय की काय? असा सुर समाजातुन उमटु लागलाय.
पुणे-मुंबईचं लोन आता ग्रामिण भागात
    पुर्वी पुणे-मुंबईसारख्या शहरी भागात घडणा-या खुनासारख्या गंभिर घटनांचे लोन आता ग्रामिण भागात पोचले असल्याचेच या घडलेल्या घटनांवरून दिसुन येत आहे. पुर्वी ग्रामिण भागात खुनासारख्या दुदैवी घटना क्विचीत कधी तरी घडुन यायच्या. मात्र अलीकडील आधुनिक काळात किरकोळ गोष्‍टीही विकोपाला जाऊन त्यामधुन खुन, खुनी हल्ले यासारख्या गंभिर घटना सहज घडुन येऊ लागल्या आहेत. अगदी सिने स्टाइल पदधतीने खुलेआम तरूण तरूणांना भोसकुन जीवे ठार मारू लागले आहेत. यातुन समाजाने काय बोध घ्यायचा. उद्याच्या तरूणांसमोर काय आदर्श उभा करायचा? असे एक ना अनेक प्रश्‍न त्यामधुन सामोरे येऊ लागले आहेत.
 
Top