उस्मानाबाद -: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एन. के. जरग हे दि. 12 जून रोजी उस्मानाबाद येथे येत आहेत. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्ह्यात इयत्ता तिसरीच्या अध्यापन करणा-या शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमास जरग हे भेट देणार असल्याचे प्राचार्या कमलादेवी आवटे यांनी कळविले आहे.
सदर जिल्हा दौ-यात उस्मानाबाद, परंडा, भूम, कळंब, वाशी, तुळजापूर, लोहारा, उमरगा येथील प्रशिक्षणास भेट देतील. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 व आर.टी.ई.2009 च्या अंमलबजावणीकरीता सदर अभ्यासक्रम अत्यंत महत्वाचा असून मा. संचालक यांचेकडून सुक्ष्मपणे प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही कळविण्यात आले आहे.