पांगरी (गणेश गोडसे) :- कारी ता.बार्शी येथे मंगळवार दि. 3 जून रोजी पहाटे तीन ठिकाणी चो-या करण्‍यात चोरटे यशस्वी झाले आहेत. चोरटयांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. तात्यासाहेब भिमराव डोके, तानाजी गोरोबा शिंदे व दिलीप भागवत मगर अशी चोरीचा यशस्वी प्रयत्न झालेल्याची नांवे असुन वेळीच जाग आल्यामुळे महेश राजेंद्र गायकवाड व अरूण सुब्राव बोडके यांच्या घरी चोरीचा प्रयत्न असफल झाला.
    याबाबत संबंधीतांकडुन प्राप्त माहिती अशी की, मंगळवारी पहाटे अज्ञात चार तरूणांच्या टोळक्यांनी कारीच्या विविध भागात धुमाकुळ घालुन घरे फोडुन चो-या करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. चोरटयांनी तात्यासाहेब डाके यांच्या घराच्या पाठिमागील भिंतीवरून आतमध्ये प्रवेश करत दरवाजा उघडुन घरात प्रवेश करूण कपाटाच्या चाव्यांची शोधाशोध करूण कपाट उघडुन कपाटात ठेवलेले रोख साडेपाच हजार रूपये व र्इतर साहित्य चोरून नेले. त्यानंतर चोरटयांनी आपला मेर्चा गवातीलच दिलीप भागवत मगर यांच्या घराकडे वळवुन घरात प्रवेश करून रोख दोन हजार रूपये व सोन्याचे दागिने चोरून नेले. तानाजी गोरोबा शिंदे यांच्या घरात घुसुन घरातील सुटकेस व इतर साहित्य रस्त्यावर आणुन फेकुन दिले. महेश राजेंद्र गायकवाड यांच्या घराच्या गेटवरून आत प्रवेश केला. मात्र घरातील माणूस जागी झाल्यामुळे तेथे व अरूण बोडके यांच्या घरी चोरी करण्‍याचा चोरटयांचा प्रयत्न असफल झाला. अनोळखी चार तरूणांच्या गटाने गावात धुमाकुळ घालुन चो-या व चो-यांचे प्रयत्न केल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
 
Top