परळी - भाजपचे ज्येष्ठ नेते, देशाचे ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या आवारात लाखोंच्या साक्षीने मुलगी आमदार पंकजा पालवे- मुंडे यांनी दुपारी दोन वाजता मुखाग्नी दिला. त्या आधी लातूरहून हेलिकॉप्टरने त्यांचे पार्थिव परळीत आणण्यात आले. येथे लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या अत्यंदर्शनासाठी जमले होते. अनेक केंद्रीय मंत्री, भाजपेच कार्यकर्ते आणि इतरही पक्षांचे नेते त्यांच्या अंतिम दर्शनासाठी परळीत आले.
बीड: एक धगधगता प्रवास... एक कणखर व्यक्तिमत्त्व... एक तेजस्वी राजकारणी.. गोपीनाथ मुंडें. या लोकनेत्याचा प्रवास अखेर आज परळीत येऊन थांबला. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर परळीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोपीनाथ मुंडे अमर रहे अशा घोषणांनी आसमंत दणाणला. मुंडेंच्या अंतिम दर्शनासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, भाजप खासदार रावसाहेब दानवे उपस्थित होते.