बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा करुन लेखी तक्रारी देऊनही अधिकार्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे विद्युत विभागाच्या तांत्रीक कर्मचारी संघटनेच्या वतीने बार्शी कार्यालयासमोर संघटनेचे विभागीय अध्यक्ष व्ही.पी.रेगुडे व उपविभागीय अध्यक्ष ए.बी.देहटे यांनी बेमुदत अमरण उपोषण सुरु केले आहे.
सन २०१२ पासून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील तांत्रीक कर्मचार्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार केला, वरिष्ठांशी चर्चा केली असतांनाही कर्मचार्यांच्या अत्यावश्यक सोयींकडे दुर्लक्ष करुन मनमानी केल्यामुळे नाईलाजास्तव उपोषण केल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
तांत्रीक कामगारांच्या या मागण्यांबाबत संघटनेच्या वतीने अनेकवेळा मागणी केल्या, त्या बार्शी विभागांतर्गत वाहिनी दुरुस्ती, देखभाल व रोहित्र बदलणे यासाठी लागणारे आवश्यक साहित्य उपलब्ध करुन द्यावे, बार्शी विभागात येणार्या सर्व उपकेंद्रातील अडचणी त्रुटी, गैरसोयीबाबत वारंवार पत्रव्यवहार केला, तांत्रीक कामगारांना तांत्रीक कामे दिल्याने इतर तांत्रीक कामगारांवर पडणारा अतिरिक्त बोजा कमी करावा, ब्रेकर बायपास, सीटी बायपास, अर्थिंगसाठी पाणी उपलब्ध नसणे, उपकेंद्रात मर्क्युरी यार्ड लाईट नसणे, बॅटरी चार्जर व बॅटरी नादुरुस्ती, खडी कमी अथवा कमतरता, नियंत्रण कक्षाची गरज, आयसोलेटर स्ट्रक्चर खराबी, ट्रिपींग कॉईल जळणे, आयसोलेटर एबी स्वीच खराबी, अतांत्रीक कामातुन कर्मचार्यांना मुक्त करणे, ग्राहकांच्या संख्या, रोहित्रांच्या संख्या, उच्चदाब व लघुदाब वाहिणींचा आढावा घेऊन परिपत्रकानुसार समान काम द्यावे, कर्मचार्यांना वेठीस धरणार्या दुय्यम अभियंत्याची चौकशी करावी, उपकेंद्रात पहारेकरी नेमावा, अधिकृत यादी, अतिकालाचा मोबदला, जनमित्रांचे चुकीच्या पध्दतीने निलंबन रोखणे, आठवडा सुट्टी, गणवेश कापड आदी विविध ४४ मागण्यांसाठी उपोषण सुरु करण्यात आले आहे.