बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींपैकी संदिप जाधव हा आरोपी बार्शी न्यायालयात हजर करुन पोलिस वाहनाजवळ नेल्यानंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. एक तासाच्या थरार नाट्यानंतर खांडवी जवळ त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ल्याप्रकरणी वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर संदिप दिलीप जाधव, दिलीप बाबजी जाधव, शिवाजी बाबजी जाधव, इंद्रजीत बाबू जाधव, बप्पा शिवाजी जाधव अशा पाच आरोपींना शुक्रवारी दि.१३ रोजी पोलिसांनी अटक करुन ताब्यात घेतले तर एक जण अद्यापही फरार आहे. सोमवार १६ पर्यंत त्यांना पोलिस कोठडी मिळाली होती. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दि.१८ पर्यंत आणखी दोना दिवसांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली होती. न्यायालयातून पोलिस वाहनाकडे नेत असतांना यातील आरोपीने संधी साधून पलायन केले होते. सदरच्या प्रकारानंतर वैराग पोलिसांच्या पायाखालची वाळू घसरली होती. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आरोपीला खांडवीजवळ अटक केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पो.नि.पवार, पो.हे.कॉं.देवकर हे घटनेचा तपास करीत आहेत.