बार्शी -: निंबळक (ता.बार्शी) येथील शेतामध्ये शेळ्या चारण्यास का सोडल्या या कारणावरुन एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली असून वैराग पोलिसांत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
नानासाहेब भराटे, संपत भराटे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मंदाकिनी भराटे यांनी वैराग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. सोमवारी दुपारी दोनच्या दरम्यान मंदाकिनी भराटे या शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी घेऊन जाताना आमच्या शेतामध्ये तू शेळ्या का आणल्या, या कारणास्तव वरील दोघांनी मंदाकिनी यांच्या तोंडावर जोराने ठोसा मारुन दोन दात पाडले. तर लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली. घटनेचा तपास पो.ना. गोडसे हे करीत आहेत.