वैराग (महेश पन्हाळे) -: नियोजित वैराग तालुका निर्मितीसाठी तहसील कार्यालय, बार्शी यांनी क्र. जमा-१/कावि /६५0/ ११ दि. ४/५/२0११ रोजी उपविभागीय अधिकारी सोलापूर यांना राज्यातील तालुका विभाजनाबाबत यांना त्यांच्या कार्यालयाचे पत्र क्र. अ/जमा /कावि /११४९/११ नुसार दोन प्रतीत प्रस्ताव दिला होता. त्यात बाश्री तालुक्याचे विभाजन झाल्यास वैराग याठिकाणी वैराग तालुक्याचे मुख्यालय असावे. अ) दळणवळण साधने एस. टी., जीप, इतर वाहनांची सोय आहे. वैराग या मध्यवर्ती ठिकाणी येणे जाण्यासाठी एस. टी.ची सोय सर्व ठिकाणाहून आहे, असेच समाविष्ट करावयाचे. गावातून वैराग येथे येण्यास पक्केरस्ते आहेत. ब) मुख्यालयापासूनचे अंतर-बाश्रीपासून वैरागपर्यंत २३ कि. मी. क) शासकीय कामासाठी येणार्या जनतेस मध्यवर्ती ठिकाण असावे. वैरागमध्ये मार्केट यार्ड असून मोठी बाजारपेठ आहे. तसेच वैराग येथून उस्मानाबाद, तुळजापूर, मोहोळ, माढा, बाश्री व सोलापूरला जण्यासाठी रस्ते आहे, अशी नोंद करण्यात आली आहे.
प्रस्तावित वैराग तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यालयाकरिता उपलब्ध असलेल्या इमारती बाबतची माहिती अशी देण्यात आली आहे की, १) तहसील कार्यालय- कुष्ठरोग नियंत्रक पथक यांचे कार्यालय. सदरचे कार्यालय सध्या बंद स्थितीत आहे . २) न्यायालय- महात्मा फुले प्राथमिक विद्यालयाची इमारत. ३) पंचायत समिती- जिल्हा परिषद शाळेची इमारत. सध्या सदर इमारतीत १५ ते २0 खोल्या असून त्यापैकी फक्त ४ खोल्या शाळेसाठी वापरात आहेत. ४) तलाठी कार्यालय- सध्या अस्तित्वात असून तीच इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे. ५) पोलीस स्टेशन - सध्या अस्तित्वात असून तीच इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे. ६) निवासस्थान- सध्या हिंगणी (पा) प्रकल्प कार्यालय वैराग यांचे कार्यालयालगत दोन निवासस्थाने अधिकारी यांना राहण्यास योग्य असून त्याशिवाय इतर कर्मचारी यांचे निवासाची रिकाम्या २0 ब्लॉकची सोय उपलब्ध आहे. ७) शासकीय विश्रामगृह- बाश्री सोलापूर रोडवर सार्वजनिक बांधकाम खात्याचे विश्रामगृह सध्या अस्तित्वात आहे.
नियोजित वैराग तालुक्यासाठी निर्माण करावयाची पदे तहसीलदार-१, निवासी नायब तहसीलदार-३, अव्वल कारकून-८, लिपीक संवर्ग-१५, शिपाई संवर्ग-१0, वाहन चालक-१ अशी पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
नियोजित वैराग तालुका निर्मितीसाठी मुख्यालयाच्या ठिकाणी उपलब्ध असलेली व आवश्यक असलेली कार्यालये पोलीस स्टेशन, दुय्यम निबंधक कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, मृदू संधारण कार्यालय, सिटी सर्व्हे कार्यालय, मराविम कार्यालय, टेलिफोन कार्यालय, विश्रामगृह, पाटबंधारे उपविभाग, वेअर हाऊस, मार्केट यार्ड़
नियोजित वैराग तालुक्यासाठी वाहनाची उपलब्धता असल्यास तपशील नसल्यास त्याबाबतची मागणी खर्चाच्या अंदाजासह- वैराग हा नवीन तालुका निर्माण झाल्यानंतर तहसील कार्यालयासाठी-१,पंचायत समिती कार्यालयासाठी -२ अशा एकूण तीन वाहनांची आवश्यकता भासेल, त्यासाठी अंदाजे ३0 लाख अपेक्षित खर्च आहे. तालुका निर्मिती करण्याकरिता अंदाजित खर्चाचा तपशील पुढीलप्रमाणे प्रस्तावित पत्रात देण्यात आला आहे. कार्यालयीन भाडे- शासकीय इमारती उपलब्ध आहेत. वाहन खरेदी- ३0 लाख, इंधन खर्च रु. १0 हजार दरमहा याप्रमाणे वार्षिक १ लाख २0 हजार, दूरध्वनी खरेदी - ५ हजार, दूरध्वनी बिल दरमहा ३ हजार याप्रमाणे वार्षिक ३६ हजार. फर्निचर खरेदी ५ लाख रुपये, संगणक संच प्रत्येक लिपिकास एक याप्रमाणे १५ संगणक प्रत्येकी रु. ३0 हजार प्रमाणो ४ लाख ५0 हजार वैराग तालुका निर्मितीचा अंदाजित खर्च केवळ ४१ लाख रुपये आहे.
वैराग तालुका झाल्यास वैराग तालुक्याचे निर्मितीनंतरचे भौगोलिक क्षेत्र हेक्टर ६३१९९.७६ आर तर सन २0११ चे जनगणनेनुसार वैराग तालुक्याची लोकसंख्या ११९४0२ एवढी दाखवण्यात आली आहे. अशा आशयाचे दोन प्रस्ताव तहसीलदार बाश्री यांनी उपविभागीय अधिकारी सोलापूर यांना दिले आहे.
नुकतेच महाराष्ट्र शासनाने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हा होणार असे जाहीर केले आहे त्यानिमिताने गेल्या साठ वर्षा पासून मागणी असलेला वैराग तालुका सुध्दा निर्माण व्हावा. जेणे करून भागातील जनतेचा वेळ ,पैसा ,मानसिक त्रास वाचेल अशी भावना, मागणी व अपेक्षा या सरकार कडून व्यक्त करण्यात येत आहे.