बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शेतकरी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी येथील तहसिल कार्यालयालयासमोर धरणे व तालुका कृषि अधिकारी कार्यालयासमोर बोंबांबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार नागेश गायकवाड, तालुका कृषि अधिकारी श्रीधर जोशी यांना शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले.
    शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्काच्या विविध मागण्यांची नोंद घेऊन पंधरा दिवसांपर्यंत पूर्तता करावी, शेतकरी याकरिता तीव्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दुष्काळ व गारपीठीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून शासनाच्या वतीने अल्पशा प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येत आहे परंतु त्यापासून अनेक शेतकरी आजही वंचित राहिले आहेत. कांद्यावर लावण्यात आलेले निर्यात शुल्क माफ करावे. शेतकर्‍यांसाठी शिक्षण, नोकरी व राजकिय क्षेत्रासाठी आरक्षण द्यावे. बि-बियाणे, रासायनिक खते, केरोसीन, इंधन गॅस, रास्तभाव धान्य तसेच पेट्रोल पंपावरील बेकायदा धंदे बंद करावे. ज्वारी मका, कांदा, कापूस, सोयाबिन, तूर, गहू, मुग, उडीद यासारख्या शेतमालावरील निर्यातबंदी उठवावी. ज्वारी व मक्यापासून इथेनॉल बनविण्याची परवानगी द्यावी. सद्यस्थिती असलेल्या साखरेच्या दराचा विचार करता शेतकर्‍यांच्या उसाचा अंतीम हप्ता त्वरीत व वाढवून देण्यात यावा. ग्रामीण भागांना जोडण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
    यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर गायकवाड, हनुमंत भोसले, दिलीप चव्हाण, अजित जगदाळे, वैजिनाथ आडसूळ, तात्या शिंदे, रामचंद्र माने, अर्जुन माळी, नितीन शेळके, एकनाथ गुंड, भारत पवार, सोमनाथ लोखंडे, विकास पाटील, नितीन पाटील, अमोल नाईकवाडी, ठोंगे गुरुजी, किसन यादव, कल्याण पाटील, सर्जेराव यादव, बाळासाहेब उमाटे, शिवाजी उमाटे, शिवलिंग घोंगडे, महेश केदार, मुस्सा मुलाणी, सचिन आगलावे, दिलीप शिंदे आदी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top