कळंब -: भाटशिरपुरा (ता. कळंब) येथील कै. भाई नारायणराव लोमटे माध्‍यमिक विद्यालयाचा दहावी परीेक्षेचा निकाल शंभर टक्‍के लागला आहे. 
        शाळेतून कु. मंजिरी सतीश खापे ही विद्यार्थिनी 93.60 टक्‍के घेऊन प्रथम तर प्रियंका दिनकर चाळक 84.09 टक्‍के मिळवून द्वितीय तर प्रियंका विजयकुमार गायकवाड 82.40 ही तृतीय आली आहे. विशेष प्राविण्‍यासह सात विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले आहेत. यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचे संस्‍थेचे सचिव बाळासाहेब धस, अध्‍यक्ष बाबुराव जाधव, सरपंच अच्‍युत गायकवाड, मुख्‍याध्‍यापक सुरेश टेकाळे, शिक्षणाधिकारी एस.टी. नलावडे, विस्‍ताराधिकारी रविंद्र लोमटे, केंद्रप्रमुख एस.पी. वाळके, एम.डी. देशमुख, माजी शिक्षणाधिकारी आर.जे. कुलकर्णी यांच्‍यासह शिक्षक, शिक्षकतेत्‍तर कर्मचारी व ग्रामस्‍थांनी अभिनंदन केले आहे.
 
Top