उस्मानाबाद -: जिल्ह्यात सन 2013 मध्ये जाणवलेल्या भीषण  पाणीटंचाईचा जिल्हा प्रशासनाने केलेला मुकाबला आणि जनजागृती व लोकप्रबोधनातून टंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांचे मिळवलेले सहकार्य यावर टंचाईची यशस्वी मूकाबला ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली असून राज्याचे मुख्यमंत्री प्रृथ्वीराज चव्हाण  यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात त्याचे प्रकाशन करण्यात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी तथा यशदाचे उप महासंचालक डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या पुढाकारातून ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
    यशदा येथे झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह यशदाचे महासंचालक डॉ. संजय चहांदे, उपमहासंचालक डॉ. नागरगोजे, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, डॉ. विकास खारगे, उस्‍मानाबाद जिल्हा नागरी विकास यंत्रणेचे प्रकल्प  अधिकारी यु. एस. कुरवलकर आदींची उपस्थिती होती.
    सन 2013 मध्ये राज्यासह संपूर्ण जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला सर्वच जिल्ह्यांनी विविध टंचाई उपाययोजना राबविल्या. उस्मानाबाद जिल्ह्याने तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांच्या पुढाकारातून टंचाईवर मात करण्यासाठी विविध पातळीवर व विविधांगी प्रयत्न केले. भूभौतिक सर्वेक्षणाव्दारे संपृक्त पाणीक्षेत्र निश्चित करणे, भपृष्ठावरील जलसाठयावर बाष्पीपभवनरोधक उपाययोजना, बंद पडलेल्या विंधन विहीरींचे पुनर्जीवन आदी उपाययोजना टंचाईपुर्व काळातच राबविण्यात आल्या होत्या. टंचाई काळात पारंपारीक उपाय योजनांसोबतच काही नावीन्यपूर्ण व अपारंपारिक उपाययोजना राबविण्यात आल्या. धरणांच्या बुडीत क्षेत्रातील चरातून पाणी मिळविणे या उपाययोजनेतून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनेक गावांना ऐन टंचाई काळात पाणीपुरवठा करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
       जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी करण्यात आलेले सर्व प्रयत्न पुस्तिकेच्या रुपात मांडावेत आणि इतरांसाठी ते सहाय्यभूत ठरावेत, यासाठी तत्कालित जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी प्रयत्न केले. त्यातूनच या पुस्तिकेची निर्मीती झाली.
 
Top