शिबीराचे उदघाटन सरपंच गणपती माळी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन सिध्देश्वर कस्तूरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी शिंदे, बाबा बेटकर, संगमेश्वर साखरे, पोलिस पाटील साधू माळी, सुर्यकांत कांबळे, श्रीशैल सुरवसे आदी मान्यवरांसह दृष्टी उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जगदाळे, व शिबीराचे मार्गदर्शक डॉ. सिद्राम खजूरे आदी उपस्थीत होते.
यावेळी अशोक जगदाळे बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागात आरोग्याच्या समस्या आम्हाला जाणवत होत्या म्हणून ग्रामीण भागातील महिलांना व पुरुषांना त्यांच्या वयाच्या चाळीस वर्षापासून होणार्या आजारावर चाचणी करुन निदान करणे आवघड आहे. तशा चाचण्या आमच्या प्रतिष्ठाणच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत, या पूढेही अशा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण आरोग्य डोळयासमोर ठेवून तशी वाटचाल आम्ही करणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले .
दरम्यान या शिबीरामध्ये जवळपास साडेतीनशे महिलांची तर एकशे वीस पुरुषांची तपासणी करण्यात आली. सोलापूर येथील अश्वीन रुग्णालय व संशोधन केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी वर्ग यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी शिवाजी शिंदे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ.सिद्राम खजूरे यांनी केले. या कार्यक्रमास गावातील राम सुरवसे, भिमाशंकर माळी, गुणवंत कोनाळे यांच्यासह बहूसंख्य नागरीक उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत जगदाळे, शरद देशमुख, महेश जळकोटे, कोळगे, मुन्ना वाले, पंकज ग्रामोपाध्याय, राहूल जाधव, विकास यादव, आदींनी परीश्रम घेतले.