उस्मानाबाद : पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर रविवारी पात्र ४६३ जणांची लांब उडी, गोळाफेक आदी विविध चाचण्या घेण्यात आल्या. तर तिसर्‍या दिवशीही १५५ जणांनी पोलिस भरतीस दांडी मारली असून, १३२ जण विविध चाचण्यांमध्ये अपात्र ठरले.
       पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर १४0 पोलिस शिपाई भरतीसाठी ६ जून पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रविवारी बोलाविण्यात आलेल्या ७५0 अर्ज भरलेल्या उमेदवारांपैकी ५९५ जणांनी उपस्थिती लावली. यातील १३२ उमेदवार मूळ कागदपत्रासह छाती, उंचीत तपासणीत अपात्र ठरले. तर पात्र ठरलेल्या ४६३ जणांची लांब उडी, गोळा फेक, पुलअप्स, १00 मीटर धावणे आदी शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. या उमेदवारांची पाच कि.मी.धावण्याची सोमवारी सकाळी विमानतळ रोडवर चाचणी घेण्यात येणार आहे. तर सोमवारी अर्ज भरलेल्या क्रमांक १४१0१२७00२८२७ ते १४१0१२७00३७९0 पर्यंतच्या ७५0 उमेदवारांनाभरती प्रक्रियेसाठी बोलाविण्यात आले आहे. उमेदवारांनी वेळेत आवश्यक ती कागदपत्रे घेवून पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर उपस्थित रहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.
 
Top