उस्मानाबाद -: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत सुशिक्षित युवक-युवतींसाठी  उस्मानाबाद येथे दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुट पालनाचे प्रशिक्षण दि.24 जुन ते 4 जुलै,2014  या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
    या प्रशिक्षणात दुध व्यवसायाचे महत्व, गायीच्या जाती, चाऱ्यांचे नियोजन, लसीकरण, दुधाचे पॅकिंग, दुध विक्री तसेच शेळी पालन, उस्मानाबादी शेळीचे महत्व, करड्याची निगा, शेळीचे लसीकरण, त्यांचा आहार व आजाराविषयक  माहिती तसेच अर्धबंदिस्त व बंदिस्तशेड, शेळीच्या वेगवेगळ्या जाती व कुक्कुट पालनात गावरान व बॉयलर याविषयी माहिती दिली जाईल. याविषयी दररोज तज्ञ व्यक्तीचे  व यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 
    तसेच उद्येाजकीय संभाषण कौशल्य, व्क्तीत्व विकास, प्रकल्प अहवाल, बँक व शासकीय कर्ज प्रस्ताव, अहिल्याबाई होळकर महामंडळ आणि नाबार्ड आदि विषयी माहिती देण्यात येणार आहे.
  इच्छुक युवक-युवतींनी अधिक माहिती व अर्जासाठी कार्यक्रम समन्वयक सुरवसे मो. न.9921771935/9956808879 महाराष्ट्र  उद्योजकता विकास केंद्र व्दारा- जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबद येथे संपर्क साधण्याचे आवाहन कनिष्ठ प्रकल्प अधिकारी,उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top