उस्मानाबाद :- कॅरी बॅग मुक्त जिल्हा बनविणे आणि प्लॉस्टीक पिशवीचे उच्चाटन करणे या उद्देशाने व बचतगटांना रोजगार उपलब्ध होऊन व्यापा-यांकडून ग्राहकांना देण्यासाठी कागदी पिशवी वापर होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पेनून बचतगटांनी साकार केलेल्या कागदी पिशवी केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
येथील नगर पालिकेच्या शॉपींग सेंटर मधील नायगावकर मेडिकल स्टोअर्स जवळील गाळा, उस्मानाबाद येथे नगर परिषद व महिला आर्थीक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर, नगर परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी, व्यापारी, नागरीक उपस्थित होते.
यावेळी डॉ.नारनवरे म्हणाले की, व्यापाऱ्यांनी यापुढे दुकानातील साहित्य ग्राहकांना देण्यासाठी या कागदी पिशव्याचा वापर करुन उस्मानाबाद जिल्हा कॅरीबॅगमुक्त करावा. या उपक्रमांत शहरी व ग्रामीण भागातील महिला बचत गटाने सहभाग घेवून आपली आर्थिक उन्नती साधावी, त्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. या कागदी पिशवी बरोबरच कापडी पिशव्याही विक्रीसाठी तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या उपक्रमात राधाकृष्ण महिला बचतगट सांजाबेस, यश महिला बचत गट, भिमनगर आणि अंकीता महिला बचत गट तांबरी विभाग, उस्मानाबद यांनी सक्रीय सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे त्यांनी कौतूक केले. या बचतगटामार्फत 250 ग्रॅमपासून ते 2 किलोपर्यत साहित्य बसेल अशा कागदी पिशव्या उपलब्ध असून प्रत्येकी 100 नगासाठी रुपये 20, 30 व 35 अशी किंमत ठेवण्यात आली आहे. यावेळी या कागदी पिशव्याची व्यापा-यांनी खरेदी केली.