बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: स्वत:ला विजयाचे शिल्पकार म्हणवून घेण्याचा कोणालाही नैतिक अधिकार नसून गावपातळीवर बुथयंत्रणा सांभाळणारे व घरोघरी शिवसेनाप्रमुखांचे विचार पोहोचवणारे शिवसैनिकच विजयाचे शिल्पकार असल्याचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी म्हटले.
     लोकसभा निवडणूकीत शिवसेना पक्षाला चांगल्या मताधिक्याने विजयी केल्याबद्दल बार्शी शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने जनतेच्या आभारासाठी बार्शीतील जुना गांधी पुतळा चौकाजवळ विजयी सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे बाबासाहेब कापसे, तालुका प्रमुख काका गायकवाड, महिला आघाडी प्रमुख मंगलताई पाटील, रामभाऊ जगदाळे, मनिषाताई नान्नजकर, दिपक आंधळकर, तानाजी बोकेफोडे, नागजी नान्नजकर, श्रीधर कदम, जयगुरु स्वामी, पद्मजा काळे, सोमनाथ सुरवसे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी बुथप्रमुख शाखा प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
 
Top