बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- ग्रामरोजगार सेवक तथा मुकादमाचे काम करणार्या कर्मचार्यांना प्रतिदिनी किमान ३५० रुपये अथवा दरमहा १० हजारांचे वेतन देण्यात यावे, केंद्र किंवा राज्य शासनाचे नियुक्तीपत्र व ओळखपत्र द्यावे, प्रवास व निवासभत्ता, थकीत भत्ता देण्यात यावे या मागणीसाठी बेमुदत संप सुरु केल्याची माहिती ग्रामरोजगार संघटनेचे शंकर गायकवाड व महेश घावटे यांनी दिली.
रोजगार हमीच्या कामासाठी हे सेवक काम करत असतांनाही त्यांच्या उपजीवीकेचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यात येत नसून शासनाकडून मात्र सर्वसामान्यांना ३६५ दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे बनावट चित्र दाखविण्यात येते. ग्रामसेवक हे सदरच्या कामात वरिष्ट अथवा राजकिय व्यक्तींशी हातमिळवणी करुन केवळ चुकीच्या पध्दतीचा अवलंब करत असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला आहे.