जळकोट : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे घरगुती वापराच्या शंकरराव भारत गॅस वितरण केंद्राचे उद्घाटन दि. २ जुन रोजी भारत पेट्रोलियम कार्पाेरेशन लि. या कंपनीचे सोलापूर प्लँट येथील तांत्रिक व्यवस्थापक विलास पठराबे, सोलापूर येथीलच सेल्स मॅनेजर फिरोज शेख यांच्या हस्ते सकाळी ११ वा. फित कापून उद्घाटन करण्यात आले.
    जळकोट ता. तुळजापूर येथे घरगुती गॅस तात्काळ मिळण्याची सोय झाल्याने जळकोटवासीयांसह परिसरातील जनतेतुन समाधान व्यक्त केले जात आहे. याप्रसंगी विलास पठराबे यांनी गॅस वितरण, वापर व अन्य तांत्रिक माहिती उपस्थित ग्राहकांना दिली. जळकोट व परिसरातील जनतेनी गॅस कनेक्शन घेऊन जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थित जनतेस केले. गॅस घेतल्याने गृहिणींना धुराचा त्रास तर होणार नाहीच शिवाय चुलीसाठी सरपण वापरण्याची अजिबात गरज नाही. त्यामुळे लाकडाची बचत होऊन वृक्षतोड थांबवण्यास मदत होणार असल्याने वृक्ष वाचल्याने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्वपूर्ण मदत होणार आहे असे सांगून गॅस वापराचे महत्व विषद केले.
    प्रारंभी शंकरराव गॅस वितरण केंद्राचे प्रो. प्रा. प्रदिप नारायण अंगुले यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल, फेटा, श्रीफळ देऊन सत्कार केला. भारत गॅस वितरण केंद्राची मान्यता दिल्याबद्दल उपरोक्त कंपनीच्या अधिका-यांचे आभार माणून जळकोटसह परिसरातील जनतेनी गॅस कनेक्शन घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन केले.
    याप्रसंगी माजी सरपंच, तमणाप्पा माळगे, संजय अंगुले, ग्रा. पं. सदस्य कृष्णात मोरे, शंकर कदम, गोविंद चुंगे, शिवानंद सोळशे, सहशिक्षक किरण कदम, कुलस्वामिनी सुत गिरणीचे संचालक महेश कदम, माजी ग्रा. पं. सदस्य गजेंद्र कदम, अ‍ॅड. अंगद कदम, दत्तात्रय कदम, लहू कदम, संजय कार्ले, जितेंद्र कदम, अंकुश लोखंडे, मनोज गंगणे, संतोष कदम, शंकर जाधव, सतिश पटणे, ओम अंगुले, विजय अंगुले आदिसह नागरिक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रदिप अंगुले यांनी मानले.
 
Top