उस्मानाबाद : जिल्ह्यात बुधवार दि. 4 मे रोजी दुपारी वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. यात उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि) येथील युवकाचा तर धारुर येथील १७ वर्षीय तरुणीच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली असून अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले.
उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि)परिसरात बुधवारी दुपारी ३.३0 ते ४ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली.यावेळी शेतात काम करीत असताना पाऊस आल्याने गोठय़ाकडे निघालेल्या प्रशांत उत्तम वाडकर (वय २२) या युवकाच्या अंगावर वीज पडल्याने तो जागीच ठार झाला.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्याचप्रमाणे तुळजापूर शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे येवती, हंगरगा, आरळी, बोरी, आपसिंगा येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. तसेच झाडेही उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी ही झाडे विद्युत तारेवर कोसळल्याने वीज खंडित झाली आहे.
उस्मानाबाद शहरात पुजारी मंडळासमोर बसवंतवाडी येथील राहुल रावसाहेब ताटे (वय २७) हा युवक दुचाकीवरुन जात असताना जोरदार वार्यामुळे दुचाकी घसरुन पडली. दुचाकीस्वार रस्त्यावर पडलेला असतानाच पाठीमागून येणार्या ट्रकने त्याला उडविले. यात त्याचा मृत्यू झाला. उस्मानाबाद शहर व परिसरातही जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील धारुर येथील मनिषा मोहन पवार ही तरुणी कुटुंबियासमवेत शेतामध्ये खुरपणीच्या कामासाठी गेली असता, ४ वाजण्याच्या सुमारास तिच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला.