उस्मानाबाद :- डी. टी. एड प्रथम वर्ष प्रवेशाबाबत सन 2014-2015 मधील दि. 3 जुलै,2014 ते 16 जुलै,2015 या कालावधीत केंद्रीय प्रक्रियेनंतर शासकीय कोट्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद येथील मराठी व उर्दु माध्यमाच्या रिक्त राहिलेल्या जागेवरील प्रवेशासाठी दि.23 जुलै,2014 रोजी डी. टी. एड. प्रवेशास इच्छुक पात्र उमेदवारांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, डी. आय. सी. बायपास रोड, बार्शी नाका, तांबरी विभाग, उस्मानाबाद येथे सकाळी 10 वाजता सर्व आवश्यक त्या मुळ प्रमाणपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या,डॉ. कमलादेवी आवटे यांनी केले आहे.
यापूर्वी डि. टी. एड प्रवेशासाठी आवेदनपत्र न भरलेले विद्यार्थी सदर प्रवेशासाठी उपस्थित राहू शकतील.उपस्थित उमेदवारांमधून पात्र उमेदवारांना डी. टी. एड. प्रवेश नियमावली व माहिती पुस्तिका 2014-15 नुसार गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.