उस्मानाबाद -: जिल्ह्यातील महिलांसाठी असलेल्या महिला लोकशाही दिनात विविध विभागाकडून प्रकल्पग्रस्त, जमीन फेरफार, आणि घर बांधकाम प्रत्येकी एक प्रकरण दाखल झाले आहेत. महिला अडचणी दुसऱ्याला सांगण्यासाठी घाबरत असतात. त्यामुळे त्यांच्या अडचणी कमी न होता त्या वाढतच जातात. त्यासाठी महिला-महिलांचे गट निर्माण केल्यास त्यांच्यातील संवाद होऊन अडचणी सोडविण्यासाठी मदत होईल. महिला सक्षमीकरणासाठी बचतगट, आशा, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत महिला अधिक गतीमान होण्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महिला लोकशाही दिन, महिला सक्षमीकरण, पुनर्वसन समिती आणि सर्वसमावेशक जिल्हा महिला सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, अप्पर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीरंग तांबे, तुळजापूरच्या उप विभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे, महिला व बालकल्याण विभागाचे एन.इ. कोळगे, व्ही.जी.शिंदे, पी.व्ही.मनाळे यांच्यासह विविध विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महिलांवरील अत्याचार व अन्यायाच्या घटना होऊ नयेत, महिलांना जिल्ह्यात सुरक्षित वातावरण असावे, कौटुंबिक पातळीवर आणि सार्वजनिक ठिकाणीही त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे त्यादृष्टीने विविध यंत्रणांचा समावेश करुन त्यांच्या माध्यमातून एक माहितीगट तयार करण्यात येत आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी स्पर्श रुग्णालय, सास्तूर येथे जिल्ह्यातील वर्ग-1 व वर्ग-2 च्या महिला अधिकारी यांची कार्यशाळा आयोजित केली होती. महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पोलीस, विविध सामाजिक संस्थांसह विविध यंत्रणांचा यात समावेश असणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या यंत्रणांचा समावेश असणारा एक माहितीगट स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनातील विविध यंत्रणांचा यात समावेश राहणार असल्याचेही डॉ.नारनवरे यांनी या बैठकीत सांगितले.