उस्मानाबाद :- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिकांचा जिल्हा स्तरीय मेळावा 28 जुलै रोजी सकाळी 11-30 वाजता येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास मुख्य कार्यकारी अधिकारी  व  जिल्हा पोलीस अधीक्षक,उस्मानाबाद हे उपस्थित राहणार आहेत.
    या मेळाव्यात जिल्ह्यातील माजी  सैनिक संघटनेचे अध्यक्ष, माजी सैनिक /युध्द विधवा  माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून यात त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जाणार आहेत.
    सदरील मेळाव्यात माजी सैनिकांच्या जमिन, पोलीसाविषयी तक्रारी निवारण  करण्यासाठी  संबंधीत तालुक्याचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक  उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व माजी सैनिकांनी / युध्द विधवानी तसेच माजी सैनिकांचे विधवा पत्नी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा  सैनिक कल्याण अधिकारी  मेजर  (नि), सुभाष सासने यांनी केले आहे.
 
Top